जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६.....नामनिर्देशन प्रक्रियेदरम्यान निर्बंधाबाबत सूचना जारी
सिंधुदुर्ग
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुक विभाग व कुडाळ पंचायत समिती निर्वाचक गणामधील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. नामनिर्देशन प्रक्रियेदरम्यान निर्बंधाबाबत सूचना जारी करण्यात आली आहे.
नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची वेळ आणि ठिकाण
- नामनिर्देशन पत्रे दिनांक 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026 (बुधवार) या कालावधीत सकाळी 11 पासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत (रविवार दि. 18 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यानुसार नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत.)
-उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे "तहसिलदार कार्यालय कुडाळ, तहसिलदार यांचे दालन" तळ मजला, येथे स्विकारली जाणार आहेत.
निर्बंध
-नामनिर्देशन पत्रक दाखल करणाऱ्या इच्छूक उमेदवार किंवा त्यांच्या सोबतच्या व्यक्तींच्या वाहनाची संख्या जास्तीत जास्त 2 एवढी निश्चित करण्यात आली आहे.
-नामनिर्देशन पत्र भरतेवेळी उमेदवार व सूचक यांच्या सोबत जास्तीत जास्त 2 व्यक्ती (एकूण 4) व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
-दिनांक 16 जानेवारी 2026 (शुक्रवार) ते दि. 21 जानेवारी 2026 (बुधवार) या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत 100 मीटरच्या परिसरात कुठलीही खाजगी आस्थापना सुरू ठेवू नयेत.
सावधानता
- निवडणूक सारखी संवेदनशील बाब असल्याने नामनिर्देशन पत्र दाखल करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी अनावश्यक नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी सदरची बाब करण्यात आलेली आहे.
- वैद्यकीय आपत्कालीन सेवा व इतर आपत्कालीन सेवेतील वाहनांना याबाबत मुभा देण्यात आलेली असून रुग्णांच्या नातेवाईकांनी आपली वाहने पोलिस विभागाने निश्चित केलेल्या पार्किंग क्षेत्रात पार्क करून रुग्णालयात जाण्याचे आहे.

konkansamwad 
