बांदा येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० जणांनी केले रक्तदान.
सावंतवाडी.
रोटरी क्लब ऑफ बांदा, सार्वजनिक नवरात्र उत्सव कट्टा कॉर्नर बांदा, रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आनंदी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात ७० दात्यांनी रक्तदान केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस रुग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. यासाठीच बांदा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिबिरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने ७० रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या.यावेळी दीपप्रज्वलन करून शिबिराचे उदघाट्न करण्यात आले.
यावेळी बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे, सिंधु रक्तमित्रचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, रोटरीचे अध्यक्ष सीताराम गावडे, माजी अध्यक्ष प्रमोद कामत, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन, रोटरॅक्टचे अध्यक्ष अवधूत चिंदरकर, नवरात्र मंडळाचे अध्यक्ष संजय नाईक, नियमित रक्तदाते निलेश मोरजकर, रवी गवस, सुदन केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री तेंडोलकर म्हणाले की, दिवसेंदिवस रक्ताची मागणी ही सातत्याने वाढत आहे. ही गरज भागविण्यासाठी रक्तपेढीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबीरे घेण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. सिंधुदुर्ग तसेच गोव्यात सर्वाधिक रक्त पुरवठा करणारे गाव म्हणून बांदा शहराची ओळख आहे. पोलीस निरीक्षक श्री बडवे म्हणाले कि, रक्तदान करणे ही काळाची गरज असून दात्यांचे हे ऋण कधीही न विसरता येण्यासारखे आहे. यावेळी सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत मनसूख पटेल यांनी केले.
यावेळी नवरात्र मंडळ उपाध्यक्ष प्रवीण शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, नाना शिरोडकर, सरपंच प्रियांका नाईक, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, बाळा आकेरकर, समीर सातार्डेकर, विठ्ठल उर्फ भाऊ वाळके, नागेश बांदेकर, बाळा आकेरकर, संदेश महाले, हर्षद पार्सेकर, विकी कदम, सनी काणेकर, आनंद गवस, भाऊ वळंजू, शशिकांत पित्रे, सिद्धेश पावसकर, सुनील राऊळ, निनाद पित्रे, सलील वळंजू, सिद्धार्थ पराडकर, अक्षय मयेकर, सुधीर शिरसाट, संकेत वेंगुर्लेकर, प्रसाद सातार्डेकर, पिंट्या गायतोंडे, सचिन मुळीक, मिताली सावंत, ईश्वरी कल्याणकर आदिसह चारही संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व ओरोस ब्लड ब्लड बँकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद भिडे यांनी केले तर आभार संजय नाईक यांनी मानले.