मदर तेरेसा स्कूल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

मदर तेरेसा स्कूल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

वेंगुर्ला.

    दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन सर्व ठिकाणी साजरा केला जातो.मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब संस्थेच्या श्रीम. बेनिता डिसोजा यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या जीवनातील संघर्ष सर्वांसमोर मांडला.त्यातून आता त्यांच्या जीवनात आलेले समाधान त्यांनी सांगितले. मुलांना त्यांनी महिलांचे शिक्षण व महिला सबलीकरण याविषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास एफ.एम.एम.गोवा संस्थेच्या सिस्टर ब्रिजित व सिस्टर फातिमा उपस्थित होत्या, त्यांना शाळेच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
   शाळेतील सर्व महिला शिक्षिका, पालकशिक्षक संघाच्या महिलाप्रतिनिधी, शिक्षकेतर कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांनी  महिलादिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी महिलांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा, भाषणे सादर केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी मधील कुमार वेदांत आसोलकर व कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार कुमार गेविन मोंतेरो यांनी मानले.