परुळेबाजार येथे नेत्र तपासणी आणि मोफत आरोग्य शिबिर संपन्न.

परुळे
नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान अंतर्गत परुळेबाजार येथे नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आणि महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा घोषित करण्यात आला आहे. त्यामध्ये नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान अंतर्गत भाजपा परुळे विभाग भाजयुमो वेंगुर्लेतर्फे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर तसेच महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
आज शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत परुळे बाजार सभागृह येथे सावंतवाडी संस्थानचे राजे आणि भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, डॉ उमाकांत सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, कुशेवडा सरपंच निलेश सामंत, सदस्य प्रदीप प्रभू, प्राजक्ता पाटकर, प्रसाद पाटकर, निलेश सामंत, सुनील चव्हाण, शंकर राठीवडेकर, सीमा सावंत, तंटामुक्त अध्यक्ष विजय परब, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलकंठ गोवळ, डॉ. गोविलकर यांसह आरोग्य सेविका, आरोग्य सेवक उपस्थित होते. यावेळी नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी मोफत चष्मे वाटप यासाठी तपासणी करण्यात आली.