सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच ठरल......भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे जागा वाटप निश्चित
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीचे जागा वाटप निश्चित करण्यात आले आहे. या महायुतीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसचाही सहभाग अपेक्षित आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जागा वाटप
- जिल्हा परिषद: ५० जागांपैकी भाजप ३१ तर शिवसेना १९ जागा लढवणार.
- पंचायत समिती: १०० जागांपैकी भाजप ६३ आणि शिवसेना ३७ जागा लढवणार.
मतदारसंघनिहाय जागा वाटप
- सावंतवाडी मतदारसंघ
- जिल्हा परिषद: भाजप ११, शिवसेना ६
- पंचायत समिती: भाजप १७, शिवसेना १७
- कुडाळ - मालवण मतदारसंघ
- जिल्हा परिषद: भाजप ४, शिवसेना ११
- पंचायत समिती: भाजप १५, शिवसेना १५
- कणकवली मतदारसंघ
- जिल्हा परिषद: भाजप १६, शिवसेना २
- पंचायत समिती: भाजप ३१, शिवसेना ५
जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा फॉर्म्युला
भाजप ३ वर्ष आणि शिवसेना २ वर्ष असा फॉर्म्युला ठरला आहे. या महायुतीच्या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरणात नवे समीकरणे तयार होत आहेत.

konkansamwad 
