दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये ओपन अँग्रीकल्चर क्लास रूमचा शुभारंभ.

वेंगुर्ला
दाभोली इंग्लिश स्कूल शाळेमध्ये मागील वर्षापासून शाळेच्या माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व दाते यांच्या सहकार्यातून व कॉज टू कनेक्ट फाउंडेशन व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने तसेच शाळेच्या सामाजिक वनीकरण विभाग राष्ट्रीय हरित सेना इको क्लब यांच्या वतीने ओपन एग्रीकल्चर क्लासरूम शेती प्रयोगशाळा उभारण्यात आली. शाळेमध्ये शेती व बागकाम तंत्रज्ञान विभाग याच्या प्रात्यक्षिक कार्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना शेती व बागकाम या विषयाची आवड व महत्त्व समजण्यासाठी सदर उपक्रम राबविला येत आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन
दाभोली गावचे सुपुत्र श्री वसंत प्रसाद दाभोलकर यांच्या शुभहस्ते व श्री आर टी मगदूम विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग यांनी केले.
शालेय विद्यार्थ्यांनी शेती व बागकाम तंत्रज्ञान यासाठी लागणाऱ्या विविध साधनं तसेच अवजारे यांची माहिती दिली व त्याचे उपयोग स्पष्ट केले. शेतीसाठी आवश्यक विविध वाफे पद्धती बाबत शालेय विद्यार्थ्यांनी उदा. गादीवाफा, सरी वाफा इत्यादी बाबत माहिती दिली. शेती व बागकाम विभागाच्या कृषी पदविका धारक श्रीमती प्रतीक्षा पोईपकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना या विभागाच्या प्रात्यक्षिक कार्यासाठी अत्यावश्यक ओपन एग्रीकल्चर क्लासरूमचे अर्थात शेती प्रयोगशाळेची माहिती दिली. यावेळी बोलताना श्री दाभोलकर सर यांनी शाळेने सुरू केलेल्या या अभिनव शैक्षणिक शेती विषयक अभ्यासक्रमाचे कौतुक केले व या विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध भाजीपाला यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून स्वतःची बचत करावी असे सांगितले. शालेय जीवनामध्ये अशा प्रकारच्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे असे सांगितले.
श्री आर टी मगदूम विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग यांनी राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून शाळेमध्ये सुरू केलेल्या ओपन एग्रीकल्चर क्लासरूम उपक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी शाळेमध्ये राष्ट्रीय हरित सेना इको क्लब अंतर्गत सुरू केलेल्या आमची देवराई औषधी वनस्पती उद्यान या उपक्रमाचे विशेष कौतुक करून कोकणातील पारंपारिक देवराई पद्धती व यातून पिढ्यान पिढ्या जपले जाणारे वृक्षांचे महत्त्व या दाभोली इंग्लिश स्कूल दाभोली ची आमची देवराई वन औषधी उद्यान याचे विशेष अभिनंदन केले. सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग राष्ट्रीय हरित सेना इको क्लब यांच्या माध्यमातून भविष्यात शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला. तसेच शाळेसाठी आवश्यक वृक्ष रोपे यांची मागणी केल्यास त्याची विभागाच्या वतीने शाळेसाठी उपलब्ध केली जातील असे सांगितले.
याप्रसंगी श्री तुषार पवार इंडियन रेल्वे मॅनेजमेंट अधिकारी, ऍड मयूर निकम पुणे, श्री रमण किनळेकर सर, माजी मुख्याध्यापक श्री प्रसाद दाभोलकर, श्री सुभाष गावडे सर, श्री सायमन मोनतेरो, श्री रवींद्र प्रभू, माजी विद्यार्थी, श्री सुधीर गोलतकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, श्री बागुल सर हरित सेना अधिकारी, श्री किशोर सोनसुरकर सर मुख्याध्यापक, श्रीमती रेश्मा चोडणकर, श्री वसंत पवार, श्री नितीन घोगळे आदी मान्यवर उपस्थित होते.