खर्डेकर महाविद्यालय येथे प्राध्यापक देवदास आरोलकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न.
वेंगुर्ला.
बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.देवदास रमाकांत आरोलकर हे आपल्या नियत वयोमानानुसार ३१ मार्च २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्तीपर कार्यक्रम महाविद्यालयात मंगळवार दि.२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. बी.चौगले होते.
आपल्या सेवा कालखंडात प्रा.आरोलकर यांनी दिलेल्या योगदानाचा अनेक सहका-यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.प्रा. वामन गावडे, प्रा.जे.वाय.नाईक, प्रा.डॉ.मनिषा मुजुमदार, प्रा. डॉ. विलास देऊलकर, प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, प्रा.डि.बी.राणे, प्रा.डॉ.धनश्री पाटील, डॉ.व्ही.एम.पाटोळे, प्रा.एल.बी.नैताम, प्रा.एस.टी.भेंडवडे, प्रा.शशांक कोंडेकर, डॉ.आनंद बांदेकर, प्रा. सुरेखा देशपांडे, प्रा.दिलीप शितोळे आदि सहका-यांनी त्यांच्या कार्यपध्दतीचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
प्रा.आरोलकर व सौ.आरोलकर यांचा भेटवस्तू देऊन महाविद्यालयामार्फत सन्मान करण्यात आला.आपल्या मनोगतात प्रा. आरोलकर यांनी शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संस्थेचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, चेअरमन डॉ मंजिरी मोरे-देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांचे ऋण व्यक्त करुन आपल्या वाटचालीत अनेकांनी आपल्याला सहकार्य केले तसेच कुटुंबाची व मित्र परिवाराची साथ लाभली यामुळेच हा टप्पा पार पाडू शकलो असे नम्रपणे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम.बी.चौगले यांनी प्रा. आरोलकर यांनी महाविद्यालयाच्या कामकाजात दिलेल्या सहकार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वामन गावडे यांनी तर आभार एस.एस.दिक्षित यांनी केले.या निरोप समारंभासाठी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.