आमचं सरकार वारकऱ्यांचे सरकार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
मुंबई.
आषाढी वारीच्या पूर्व नियोजनाबाबत शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत ( VC द्वारे ) उपस्थित होते. वारकरी संप्रदायांतील सर्व पालखी, विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती अध्यक्ष व सदस्य, संत समाधी संस्थान प्रमुख, संत वंशज, वारकरी फडकरी दिंडी संघटना व प्रमुख वारकरी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. बैठकीस उपस्थित असणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला मुख्यमंत्री सन्मानाने आदराने भेटले.
मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणाले की, आषाढी वारीसाठी गतवर्षी पंढरपुरात भेट देऊन, पाहणी करून तयारी केली होती. यंदाही चांगले नियोजन करून, आषाढ वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासनाच्या सर्वच विभागांनी चांगली तयारी केली आहे. विशेषतः अपघात टाळण्यासाठी गृह विभागाला नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. हे सरकार सर्व सामान्यांचे आहे. शेतकऱ्यांचे, वारकऱ्यांचे आहे. सरकराने कमी वेळात शेतकरी, माता भगिनी आणि तरुणांसाठी जास्तीत जास्त निर्णय घेतले आहेत.यां सकल वारकऱ्यांच्या भेटीने जणू पंढरपूर चा पांडुरंग व सकल संत यांचे आशीर्वाद मिळाले ही भावना त्यांनी व्यक्त केली.
सर्व सामान्य वारकरी केंद्रस्थानी ठेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे वारी बाबतचे निर्णय घेतले आहे. वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा हे साहेबांनी कृतीतून दाखवून दिले आहे. वारकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी मुख्यमंत्री कटीबद्ध आहेत.
बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय -
१) पालखी सोहळ्यातील दिंड्यांना प्रत्येकी २०, ००० रु अनुदान ( १५०० पेक्षा अधिक दिंड्यांना होणार लाभ )
२) वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी देण्यात आली आहे.
३) वारी दरम्यान वारकऱ्यांना रु.५ लक्ष विमा कवच लागू.
४) वारीच्या वाटेवरील अनाधिकृत बांधकाम हटवणार.
५) आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी उपक्रमाद्वारे आरोग्याकडे विशेष लक्ष.
६) वारीच्या वाटेवरील सर्व महामार्गांची दुरुस्ती व स्वच्छता नियोजन याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
७) वारकऱ्यांना दर्शन सुलभ होण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत.
८) पावसाळा असल्याने ठाई ठाई निवारा शेड बांधण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
९) पुण्यसलीला इंद्रायणी व चंद्रभागा नदी पात्र व परिसर स्वच्छता याकडे विशेष लक्ष दिले जाईल.
१०) वारीसाठी विशेष अधिकारी नेमणूक , वर्षभर वारकऱ्यांच्या समस्या याद्वारे सोडवल्या जाणाऱ्या याबाबत सूचना.
११) निर्मल वारी अंतर्गत मोबाईल टॉयलेट्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणार.
व इतर तत्सम सर्व महत्वपूर्ण मागण्या सरकार सकारात्मक रित्या पूर्ण करील हा विश्वास प्राप्त झाला.महत्वपुर्ण नोंद - दौंड येथील प्रस्तावित कत्तलखान्याचा विषय मांडताक्षणी मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ त्याला स्थगिती देऊन रद्द करण्याचा निर्णय घेतला.वारकरी संप्रदायाविषयी व वारी विषयी त्यांची असणारी श्रद्धा व आत्मीयता त्यांच्या प्रत्येक शब्दातून व देहबोलीतून दिसून येत होती.बैठकीस पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक पश्चिम महाराष्ट्र , पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांचे जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.