'रन फॉर युनिटी' एकतेच्या धाग्यात गुंफली निवतीची दौड
परुळे
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत निवती पोलीस दलाच्या वतीने “रन फॉर युनिटी” एकता दौड आयोजित करण्यात आली.
या भव्य दौडीत स्थानिक नागरिकांसह एस.एल. देसाई विद्यालय पाटचे विद्यार्थी व शिक्षक, पोलीस पाटील, तसेच पोलीस कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
ही संकल्पना पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या निमित्ताने निवती परिसरात देशभक्तीचा आणि एकतेचा संदेश झंकारून गेला.
दौडीत पोलीस निरीक्षक भिमसेन गायकवाड, उपनिरीक्षक दिलीप शेटये व नितीन पाटील, तसेच पोलीस अंमलदार सचिन कुंभार, विक्रांत किनळेकर, परण पोकळे, मारुती कांदळगावकर, सावंत, पोलीस पाटील श्वेता चव्हाण, प्रतिक्षा मुंडये, दादू चव्हाण, विद्यार्थीनी आर्या आमडोसकर, संदेश पवार, महानंदा गोसावी, जान्हवी खडपकर, शर्मिला जळवी, तसेच महेश कासकर, अक्षय राऊळ, प्रियदर्शी कदम, शृंगारे, जोगेश सारंग, दया तांडेल, सुबोध सावंत, कोचरेकर, वेंगुर्लेकर आदी मान्यवर सहभागी झाले होते.

konkansamwad 
