आजगाव ग्रामस्थांच्यावतीने १९ ते २० डिसेंबर रोजी 'दीपोत्सव २०२५' चे आयोजन

आजगाव ग्रामस्थांच्यावतीने १९ ते २० डिसेंबर रोजी 'दीपोत्सव २०२५' चे आयोजन

 

आजगाव
 

       आजगाव ग्रामस्थांच्यावतीने १९ ते २० डिसेंबर रोजी 'दीपोत्सव २०२५' चे आयोजन करण्यात आले असून, या दिवशी विविध स्पर्धा, कार्यक्रम आयोजित केले आहेत. १९ डिसेंबर (संध्याकाळी ५ वाजता)

 

पारंपरिक फुगडी स्पर्धा

   (आजगाव, धाकोरे, भोमवाडी, शिरोडा, आरवली, तिरोडा, मळेवाड मर्यादित) यासाठी पारितोषिके प्रथमः रोख २००० रुपये, द्वितीयः रोख १५०० रुपये तृतीय: रोख १००० रुपये

 

रेकॉर्ड डान्स स्पर्धा

(आजगाव पंचक्रोशी मर्यादित) (मोठा गट, वय १३ वर्षावरील) स्पर्धक संख्याः१०,  प्रथमः रोख २००० रु. सन्मान चिन्ह, द्वितीयः रोख रु. १५०० सन्मान चिन्ह, तृतीयः रोख १००० रु. सन्मान चिन्ह

 

       तर २० डिसेंबर रोजी (संध्याकाळी ४ वाजता) पाककला स्पर्धा (आजगाव मर्यादित) होणार आहेत.

 

स्पर्धेचा विषय

       मूग किंवा मूग डाळपासून तिखट पदार्थ, दुधापासून गोड पदार्थ (एक स्पर्धक दोन्ही प्रकारात भाग घेऊ शकतो) या स्पर्धेसाठी पारितोषिके प्रथम, द्वितीय व तृतीय (गृहपयोगी वस्तु) तसेच रेकॉर्ड डान्स स्पर्धा ठीक ६ वाजता सुरू होणार असून (लहान गट, वय ५-१२ वर्ष)(आजगाव पंचक्रोशी मर्यादित) स्पर्धक संख्याः १० असून यातील पारितोषिके प्रथमः रोख २००० रु. सन्मान चिन्ह, द्वितीयः रोख १५०० रुपये सन्मान चिन्ह, तृतीयः रोख १००० रुपये सन्मान चिन्ह

 

वेशभूषा स्पर्धा

(आजगाव पंचक्रोशी मर्यादित) लहान गट (वय ८-१५ वर्षे), स्पर्धक संख्या १० (आजगाव पंचक्रोशी मर्यादित) प्रथमः रोख २००० रुपये, सन्मान चिन्ह, द्वितीयः रोख १५०० सन्मान चिन्ह, तृतीयः रोख १००० रु. सन्मान चिन्ह, मोठा गट (वय १६ वर्षावरील), स्पर्धक संख्या १० (आजगाव पंचक्रोशी मर्यादित) प्रथमः रोख २००० रुपये, सन्मान चिन्ह द्वितीयः रोख १५०० रुपये, सन्मान चिन्ह, तृतीयः रोख १००० रुपये सन्मान चिन्ह
      तर विशेष आकर्षण पैठणी स्पर्धा यात विजेता आणि उपविजेता स्पर्धकांची निवड करण्यात येणार असून आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे.
        ज्या स्पर्धकांना स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी ९४२२३७९५८८ / ९८२३४१८८५९ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १८ डिसेंबर असून स्पर्धेचे ठिकाण केंद्र शाळा आजगाव नंबर १ व कै. नरहरी उर्फ बाब्या पांढरे रंगमंच, आजगाव आहे.