वेंगुर्लेतील स्पर्धांमधून चांगले खेळाडू निर्माण होऊन उच्च स्तरावर पोहोचावेत : सचिन वालावलकर

वेंगुर्लेतील स्पर्धांमधून चांगले खेळाडू निर्माण होऊन उच्च स्तरावर पोहोचावेत : सचिन वालावलकर

 

वेंगुर्ला
 

        लोकांसाठी काम करणे माझे मी कर्तव्य समजतो. त्यामुळे सामाजिक कार्यात मी नियमित पुढे असतो. मित्र मंडळाच्या माध्यमातून वेंगुर्ले येथे घेण्यात येणारी ही कॅरम स्पर्धा असो किंवा अन्य स्पर्धा या स्पर्धांमधून चांगले खेळाडू निर्माण व्हावे आणि ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचावेत. स्पर्धा म्हटली की हार जीत आली. पण कुणीही खचून न जाता खिलाडू वृत्तीने या खेळात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले.
      शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग डिस्ट्रीक कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने सचिन वालावलकर मित्रमंडळ, वेंगुर्ला यांच्या वतीने जिल्हास्तरीय "सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा २०२५" या स्पर्धेचे आयोजन वेंगुर्ले येथे करण्यात आले होते.नगर वाचनालय सभागृह, वेंगुर्ला येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, सुरेंद्र चव्हाण, ॲड. मनीष सातार्डेकर, माजी नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे, सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनचे सचिव योगेश फणसळकर, रोटरी क्लब वेंगुर्ले अध्यक्ष आनंद बोवलेकर, सचिन वालावलकर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष परब, शिवसेना महिला शहर प्रमुख ॲड. श्रद्धा बाविस्कर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
        वालावलकर यांच्या वाढदिवस निमित्त असतो. यानिमित्त आम्ही मंडळातर्फे जिल्ह्यातील खेळाडूंना एकत्र करून व्यासपीठ निर्माण करून देतो. सर्वांना एका छताखाली एकत्र करणे हाच उद्देश असून मंडळाने आज पर्यंत अशाच स्पर्धा घेतले असल्याचे संतोष परब प्रास्ताविक करताना सांगितले.
          यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप म्हणाले की, वेंगुर्ले शहराला स्वावलंबी बनविण्याचे स्वप्न आमचे सर्वांचे आहे. त्या अनुषंगाने शहरात वेगवेगळे स्पर्धा कार्यक्रम घेतले जातात. वेंगुर्ले मध्ये सर्व प्रकारचे खेळ घेऊ शकतो अशी व्यवस्था आपल्याकडे आहे. या स्पर्धेत ७६ स्पर्धक सहभागी झाले ही मोठी गोष्ट आहे. हे टॅलेंट देशपातळीवर पोहोचावे हीच आमची भावना आहे.
          यावेळी अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन वालावलकर मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.