वेंगुर्ला भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाची मासिक सभा संपन्न.

वेंगुर्ला.
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले ची मासिक सभा मंडळाचे अध्यक्ष ऍड. श्याम गोडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीप्रसाद बिल्डिंग, हॉस्पिटल नाका येथे संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन काही महत्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले. मंडळाचे संचालक प्रा.सचिन परुळकर यांनी Ph D प्राप्त केल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच डॉ.सुखदा सत्यभास गवंडे हिने M D परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल तिचा गुणगौरव करण्याचे ठरले. तसेच मंडळाचे मार्गदर्शक रमण किनळेकर यांना राज्यशासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. मंडळामध्ये स्वीकृत सदस्य म्हणून ऍड. प्रकाश बोवलेकर, प्रा. जी. पी. धुरी, मोहन मोबारकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
या सभेत उपाध्यक्ष रमण वायंगणकर, वृंदा कांबळी,विकास वैद्य, बाळू फटनाईक,गजानन गोलतकर, जयराम वायगणकर, सुरेश धुरी, सदानंद केरकर, अंकिता बांदेकर, श्रेया मांजरेकर, दीपक उपस्थित आदी उपस्थित होते.या सभेत प्रास्ताविक व स्वागत ॲड.गोडकर यांनी, इतिवृत्त वाचन व आभार प्रा.डॉ. आनंद बांदेकर यांनी मानले.