वेंगुर्लेत जागृती महोत्सवाचे आयोजन
वेंगुर्ले
वेंगुर्ला येथील जागृती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळातर्फे १७ व १८ जानेवारीला सिद्धिविनायक मंगल कार्यालयात जागृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
चित्रकला स्पर्धा
१७ जानेवारीला दुपारी २.३० वाजता चित्रकला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी वेगवेगळे विषय ठेवण्यात आले आहेत. पाचवी ते दहावी गटाने जलरंग वापरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
वेशभूषा स्पर्धा
बालवाडीच्या मुलांसाठी मनपसंत वेशभूषा स्पर्धा सायंकाळी ६ वाजता आयोजित केली आहे. यात म्युझिक वापराची मुभा आहे. सादरीकरणासाठी २ मिनिटांचा वेळ राहील.
मॅरेथॉन स्पर्धा
१८ जानेवारीला मुलामुलींसाठी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सकाळी ६.३० वाजता कॅम्प मैदान येथून सुरू होईल. विविध वयोगटांसाठी वेगवेगळे अंतर ठेवण्यात आले आहे.
विजेत्यांना आकर्षक बक्षिसे
सर्व स्पर्धांतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. तर सर्वाधिक पारितोषिक मिळविणाऱ्या शाळेस संजय मालवणकर स्मृती करंडक प्रदान करण्यात येईल.
नावनोंदणीसाठी संपर्क
स्पर्धकांनी आपली नावनोंदणी संबंधित क्रमांकावर करावी. अधिक माहितीसाठी 9423793034 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जागृती मंडळातर्फे करण्यात आले आहे. जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जागृती मंडळातर्फे करण्यात आले आहे.

konkansamwad 
