प्रज्ञाशोध परीक्षेत रेडीच्या मातोश्री विद्यालयाची गौतमी दुबळे हिला रौप्य पदक

प्रज्ञाशोध परीक्षेत रेडीच्या मातोश्री विद्यालयाची गौतमी दुबळे हिला रौप्य पदक

 

वेंगुर्ला


 

      महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळमार्फत घेण्यात येणाऱ्या प्रज्ञाशोध परीक्षा 2024-25 चा निकाल जाहीर झाला असून मातोश्री पार्वती राऊत विद्यालयाची आठवीची विद्यार्थिनी कु. गौतमी सिद्धार्थ दुबळे हिला रौप्य पदक प्राप्त झाले आहे. वेंगुर्ला तालुक्यातील आठवीची एकमेव विद्यार्थीनी या प्रज्ञाशोध परीक्षेत पात्र ठरली आहे. यावेळी संस्थाचिटणीस डॉक्टर विनय राऊत, डॉ. अनघा राऊत, मुख्य सल्लागार मधुकर मेस्त्री, शाळा समिती सदस्य श्रीकृष्ण पडवळ, मुख्याध्यापिका गीता विल्सन, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गौतमीचे अभिनंदन केले.