“युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस ठरला सेवाभावाचा उत्सव!”.......वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप व वैद्यकीय साहित्य प्रदान

“युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस ठरला सेवाभावाचा उत्सव!”.......वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप व वैद्यकीय साहित्य प्रदान

 

वेंगुर्ले

 

        समाजसेवेचा आदर्श ठरवत भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवा उपक्रम राबविला. वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात विविध अत्यावश्यक वैद्यकीय साहित्यांचे वाटप तसेच उपचार घेत असलेल्या महिला व पुरुष रुग्णांना फळवाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
       या प्रसंगी भाजप प्रदेश सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, जिल्हा सरचिटणीस साईप्रसाद नाईक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
        भाजप महिला मोर्चा, युवामोर्चा आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक संवेदनशीलतेचा उत्तम आदर्श घालून दिला.रुग्णालय प्रशासनाने या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत विशाल परब यांच्या पुढाकाराचे अभिनंदन केले.