भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे भराडी माते चरणी नतमस्तक

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे भराडी माते चरणी नतमस्तक

 

मालवण

 

   भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, महाराष्ट्राचे माजी मंत्री विनोद तावडे यांनी सपत्नीक आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, भाजप जिल्हाध्यक्ष  प्रभाकर सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत उपस्थित होते. यावेळी विनोद तावडे यांचा आंगणे कुटुंबीयांच्यावतीने ज्येष्ठ ग्रामस्थ सतीश आंगणे यांच्या हस्ते हृदय सत्कार करण्यात आला. आंगणेवाडी येथील जगत जननी श्री देवी भराडी माते वरती आम्हा सर्वांची नितांत श्रद्धा असून माते चरणी मागितलेली सर्व मनोकामना आमची नेहमी पूर्ण झालेली आहे. असे यावेळी बोलताना विनोद तावडे म्हणाले.या ठिकाणी जिओचा टॉवर उभारण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने लक्ष वेधण्यात आले.यावेळी आंगणे कुटूंबीयांतर्फे सतीश आंगणे, गजानन आंगणे, गणेश आंगणे, पोलीस पाटील पंकज आंगणे, रुपेश आंगणे, सत्यविजय आंगणे, संतोष आंगणे, तन्मय आंगणे, देवेंद्र आंगणे, इ. ग्रामस्थ उपस्थित होते. गजानन आंगणे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.