भीमगर्जना युवक मंडळ इन्सुलीच्यावतीने शाहू महाराजांची जयंती साजरी

सावंतवाडी
भीमगर्जना युवक मंडळ इन्सुली, रमाईनगर यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर येथे शाहू महाराजांची 151वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी शाहू महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विचार मंचावर मंडळाचे अध्यक्ष लोकदर्शी, उपाध्यक्ष कृष्णा जाधव, सल्लागार राघोबा जाधव उपस्थित होते. स्वप्नाली व राघोबा जाधव यांनी शाहू महाराजांच्या कार्याविषयी थोडक्यात माहीती सांगुन शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमात आनंद जाधव, मिथील जाधव, बाबली जाधव, दिपेश जाधव, रुपाली जाधव, सविता जाधव, संजना जाधव, वृषाली जाधव, अनुजा जाधव, स्मिता जाधव, दिपाली जाधव, गिताली जाधव, लैला जाधव, स्म्रितिषा जाधव, सृष्टी जाधव, ललिता जाधव, सानिका जाधव, मनिषा जाधव इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अरविंद जाधव व आभार कृष्णा जाधव यांनी केले.