सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतुकीसंबंधी महत्वपूर्ण बैठक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतुकीसंबंधी महत्वपूर्ण बैठक

 

मुंबई

 

       मुंबई, मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ व मालवण तालुक्यातील परिवहन सेवेसंदर्भात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे उपस्थित होते.

 

बैठकीत खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली

 

  • अधिकाऱ्यांची कमतरता
  • बस फेऱ्यांचे योग्य नियोजन
  • प्रवाशांसाठी आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव

      यावेळी कुडाळ-मालवणसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचा निर्धार करण्यात आला.बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमवेत विभाग नियंत्रक प्रकाश बोरसे, विभागीय अधीक्षक अभियंता अक्षय केकरे, विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख, तसेच विभागीय कर्मचारी अमित कलकुटकी व अन्य अधिकारी उपस्थित होते.