जेईई एडवांस्ड परीक्षा २०२४ साठी नोंदणी प्रक्रिया सुरू.

जेईई एडवांस्ड परीक्षा २०२४ साठी नोंदणी प्रक्रिया सुरू.

सिंधुदुर्ग.

   जेईई एडवांस्ड परीक्षा २०२४ साठी नोंदणी आजपासून म्हणजेच शनिवार, 27 एप्रिल 2024 पासून सुरू होत आहे. जे उमेदवार अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी JEE Advanced च्या jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.JEE Advanced 2024 साठी अर्ज 27 एप्रिलपासून सुरू होतील आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 7 मे 2024 आहे.नोंदणीसाठी शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख 10 मे 2024 आहे. 17 मे रोजी प्रवेशपत्र जारी केले जातील आणि 26 मे पर्यंत वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील.JEE Advanced Exam 2024 च्या परीक्षा रविवार, 26 मे 2024 रोजी घेली जाणार आहे. हा पेपर दोन शिफ्टमध्ये होणार असून पहिल्या पेपरची वेळ 9 ते 12 आणि दुसऱ्या पेपरची वेळ 2.30 ते 5.30 दरम्यान असेल. tकोणतेही अपडेट किंवा तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.कट ऑफ श्रेणीनुसार आहे. उदाहरणार्थ, सामान्य श्रेणीसाठी ते 100.0000000 वरून 93.2362181 वर गेले आहे. यावेळी एकूण 97351 उमेदवार येत आहेत. त्याचप्रमाणे, PWBD, OBC, EWS आणि उमेदवारांच्या इतर श्रेणींसाठी कट ऑफ भिन्न आहे.अर्ज करण्यासाठी, महिला उमेदवार, SC, ST आणि PWBD श्रेणीतील उमेदवारांना 1600 रुपये शुल्क भरावे लागेल.उर्वरित उमेदवारांची फी 3200 रुपये आहे.शुल्क फक्त ऑनलाइन स्वरूपात भरता येईल.