जिल्हास्तर युवा महोत्सवाचे २१ नोव्हेंबर रोजी आयोजन.

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे २१ नोव्हेंबर रोजी आयोजन.


सिंधुदुर्ग
     क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने सन २०२४-२५ या वर्षातील जिल्हास्तर युवा महोत्सव दि. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा नियोजन समिती हॉल सिंधुदुर्गनगरी (नवीन) येथे आयोजन करण्यात असल्याचे जिल्हा क्रिडा अधिकारी विद्या शिरस यांनी कळविले आहे.
          राष्ट्रीय युवा महोत्सव सन २०२४-२५ मध्ये संकल्पना आधारित बाबींसाठी "विज्ञान व तंत्रज्ञान वामधील नवसंकल्पना" - "Innovation in Science and Technology" ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारीत जिल्हा युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
          युवकांचा सर्वागिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. राज्यात सन २०२४-२५ या वर्षातील युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांचे वतीने आयोजित करण्यात येणार आहे. युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करुन राज्याचा प्रातिनिधिक चमु राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात येतो. जिल्हास्तर युवा महोत्सवाची नियमावली गुगल लिंकवर देण्यात आली आहे.  युवा होत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी गुगल लिंक फॉर्ममध्ये भरावा.         
          सांस्कृतिक - समुह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकगीत. कौशल्य विकास - कथा लेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, कविता स्पर्धा. संकल्पना आधरित स्पर्धा-विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना (innovation in science and technology) युवा कृती - हस्तकला, वस्त्रोद्योग, अॅगो प्रोडक्ट यावर आधारीत स्पर्धा होणार आहेत.
          जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येईल. युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नाव नोंदणी स्पर्धापूर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे करावी. तसेच सहभागाबाबत गुगल लिंकवर दि.२० नोव्हेंबर २०२४ पर्यंत नाव नोंदणी करावी. जिल्ह्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय / वरीष्ठ महाविद्यालयातील व कृषी महाविद्यालय, इंजिनिअरींग कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थोतील जास्तीत जास्त युवक युवती / संघांनी, महिला मंडळ यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ही  जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.