पाटकर हायस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न.

पाटकर हायस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न.

वेंगुर्ला

   भारतरत्न शास्त्रज्ञ डॉ. सी व्ही रमण.यांचे "रामन परिणाम" हे जगविख्यात संशोधन 28 फेब्रू.1928 रोजी प्रकाशित झाले. या संशोधनासाठी त्यांना जगातील सर्वोच्च पुरस्कार "नोबल पुरस्कार" ने सन्मानीत करण्यात आले.त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचा येतो.आज रा.कृ.पाटकर हायस्कूल वेंगुर्ला येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न झाला.
   यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री. सोकटे यांनी भूषविले.प्रशालेचे अध्यापक श्री बोवलेकर, श्री.बागुल, श्री पोटफोडे, श्री गोसावी, प्रशालेच्या सहा.शिक्षिका मांजरेकर  विज्ञान शिक्षिका सविता जाधव सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
  कार्यक्रमाची सुरूवात डॉ.सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यांनतर मान्यवर अध्यापक यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
   यावेळी विद्यार्थ्याना गणित संबोध परीक्षेची प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विज्ञान प्रतिकृतींचे मा.मुख्याध्यापक  आणि मान्यवर गुरुजनांनी कौतुक केले आणि प्रोत्साहित केले.
   या कार्यक्रमाचे सुत्र संचालन सविता जाधव यांनी केले तर   उज्जयनी मांजरेकर यांनी आभार मानले.