तहसीलमधील दिरंगाई; जनतेला न्याय मिळणार का?

वेंगुर्ला
वेंगुर्ले तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार व महसुल नायब तहसिलदार यांच्या कार्यालयीन दुर्लक्षामुळे तालुक्यातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. अर्जांचा संकलन चुकीच्या पद्धतीने होत असून, जावक टपाल आणि चॅप्टर केस वेळेत न चालल्याने आरोपी मोकाट आहेत.त्यामुळे सध्या वेंगुर्ले तहसील कार्यालयात भोंगळ कारभार सुरू असून सबंधित प्रशासनाचे अधिकारी यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी वेंगुर्ले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी राजाराम चिपकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला आहे ज्यामध्ये
- कार्यालयीन कामकाजात कोणताही नियोजन व समन्वय नाही
- आठ-आठ दिवस टपाल पडून राहतो, तातडीची कार्यवाही होत नाही
- नियंत्रण कक्ष कार्यरत नसल्याने नुकसानीची नोंद होत नाही
- नैसर्गिक आपत्ती आणि जनतेच्या अर्जांमध्ये दिरंगाई
योग्य कारवाई न झाल्यास लवकरच उपोषण पुकारले जाईल. असा इशारा चिपकर यांनी प्रशासनाला दिला आहे.