कोकणभूमी साहित्य कला संमेलनात बबली राणे यांचा सत्कार

कोकणभूमी साहित्य कला संमेलनात बबली राणे यांचा सत्कार

कणकवली 

     कणकवली तालुक्यातील ओसरगाव एम व्ही डी कला दालन कणकवली, ओसरगाव आयोजित कोकणभूमी साहित्य कला संमेलन संपन्न झाले.या कार्यक्रमांमध्ये  अतिरिक्त पोलीस अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा ऋषिकेश रावले यांच्या हस्ते गेली पंचवीस वर्ष मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांना मदत करत असलेले सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बबली राणे हे गेली अनेक वर्षे  अपघातग्रस्तांना मदत करत आहेत तसेच अनेक सामाजिक कार्यामध्ये ही त्यांचा सहभाग असतो.या कार्याची दखल घेऊन त्यांचा  सन्मान करण्यात आला. यावेळी  कवी अजय कांडर उपस्थीत होते