कुडाळ नेरूर येथे आढळला मृत बिबट्या

कुडाळ
कुडाळ तालुक्यातील नेरूर तर्फ हवेली साईगाव येथे मादी जातीचा बिबटया मृत अवस्थेत आढळून आला आहे. मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.हा वन्यप्राणी मृत झाल्याची माहिती येथील ग्रामस्थ सुर्यकांत भिकाजी कुंभार (रा. साईगाव) यांनी नेरुर वनपाल यांना फोन द्वारे दिली. नेरुर वनपाल यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.त्यांनी घटनेबाबतची माहिती कुडाळ वनक्षेत्रपाल यांना दिली. सावंतवाडी सहा. वनसंरक्षक व कुडाळ वनक्षेत्रपाल यांनी नेरुर वनपाल यांच्या समवेत जागेवर जाऊन पहाणी केली असता बिबट्या मृत झाल्याचे दिसून आले.त्यानंतर कुडाळ पशुवैदयकिय अधिकारी यांना बोलवण्यात आले, त्यांनी बिबट्याची पाहणी केली असता ती मादी असून त्याचे अंदाजे वय 4 ते 5 वर्षे असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर मृत बिबट्याचे शव आकेरी येथील वनविश्रामगृह येथे आणून त्याचे पशुवैदयकिय अधिकारी कुडाळ यांच्या मार्फत शवविच्छेदन करुन दहन करण्यात आले.शवविच्छेदन करताना मृत्युचे नेमके कारण समजण्याकरिता मृत बिबट्या मादीच्या अवयवांचे नमुने घेण्यात आले, ते न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठविण्यात येणार असून घटनेबाबत गुन्हा दाखल केला गेला आहे. या घटनेचा पुढील तपास सावंतवाडी उप-वनसंरक्षक, सावंतवाडी सहा.वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे अशी माहिती कुडाळ वनक्षेत्रपाल तपासणी अधिकारी सं. श्री कुंभार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. मृत झाल्याची माहिती येथील ग्रामस्थ सुर्यकांत भिकाजी कुंभार (रा. साईगाव) यांनी नेरुर वनपाल यांना फोन द्वारे दिली. नेरुर वनपाल यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.त्यांनी घटनेबाबतची माहिती कुडाळ वनक्षेत्रपाल यांना दिली. सावंतवाडी सहा. वनसंरक्षक व कुडाळ वनक्षेत्रपाल यांनी नेरुर वनपाल यांच्या समवेत जागेवर जाऊन पहाणी केली असता, बिबट्या मृत झाल्याचे दिसून आले.त्यानंतर कुडाळ पशुवैदयकिय अधिकारी यांना बोलवण्यात आले, त्यांनी बिबट्याची पाहणी केली असता ती मादी असून त्याचे अंदाजे वय 4 ते 5 वर्षे असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर मृत बिबट्याचे शव आकेरी येथील वनविश्रामगृह येथे आणून त्याचे पशुवैदयकिय अधिकारी कुडाळ यांच्या मार्फत शवविच्छेदन करुन दहन करण्यात आले.शवविच्छेदन करताना मृत्युचे नेमके कारण समजण्याकरिता मृत बिबट्या मादीच्या अवयवांचे नमुने घेण्यात आले, ते न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठविण्यात येणार असून घटनेबाबत गुन्हा दाखल केला गेला आहे. या घटनेचा पुढील तपास सावंतवाडी उप-वनसंरक्षक, सावंतवाडी सहा.वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे अशी माहिती कुडाळ वनक्षेत्रपाल तपासणी अधिकारी सं. श्री कुंभार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.