माणगाव तलाठी विश्वास शेणवी यांना उत्कृष्ट कर्मचारी गौरव पुरस्काराने सन्मानित.

कुडाळ.
सन 2022-23 या वर्षात महसूल विभागाच्या धोरण व उद्दिष्टांप्रमाणे ई फेरफार, ई पिक पाहणी, ई चावडी, कृषी गणना या प्रणालीमध्ये उत्कृष्टपणे काम करून शासनाची प्रतिमा उंचावण्यास हातभार लावल्याबद्दल उत्कृष्ट कर्मचारी गौरव पुरस्काराने श्री. विश्वास शिवाजी शेणवी, तलाठी माणगाव, ता-कुडाळ यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभदिनी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे शुभहस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
सदर कार्यक्रमास मा. श्रीम. के. मंजूलक्ष्मी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, मा. श्री. प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग, मा. श्री. सौरभ अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग,मा. श्री.शंकर बर्गे,अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, मा. श्री. मच्छिन्द्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, मा. श्री. विशाल खत्री, परिविक्षाधीन आयएएस आदी उपस्थित होते.