भाजप दिव्यांग आघाडीतर्फे कसाल येथे शालेय वह्यांचे वाटप

भाजप दिव्यांग आघाडीतर्फे कसाल येथे शालेय वह्यांचे वाटप

कुडाळ

 

    भारतीय जनता पार्टीच्या दिव्यांग आघाडीतर्फे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कसाल येथे शालेय वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांच्या मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, "दिव्यांग आघाडीमार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी सातत्याने विविध कार्यक्रम राबवले जातात. संदीप गावडे यांचा सर्वांशी परिचय व्हावा, यासाठी त्यांना या कार्यक्रमाला आवर्जून बोलावले होते. संदीप हा केवळ दिखाव्यासाठी काम करणारा कार्यकर्ता नसून, तो खऱ्या अर्थाने समाजासाठी कार्य करणारा कार्यकर्ता आहे." याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, युवा नेते संदीप गावडे, संध्या तेरसे, भाजप दिव्यांग आघाडीचे संयोजक अनिल शिंगाडे तसेच अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.