सिंधुदुर्गच्या पहिल्या महिला अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचा सिंधुदुर्ग भाजप महिला मोर्चातर्फे सत्कार

सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अप्पर पोलीस अधीक्षकपदी विराजमान झालेल्या श्रीम. नयोमी साटम यांचा सिंधुदुर्ग भाजप महिला मोर्चाच्यावतीने नुकताच पुष्पगुच्छ आणि चाफ्याचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रज्ञा धवन आणि जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते पार पडला. नयोमी साटम या कणकवली तालुक्यातील पिसेकामते, फणसवाडी येथील मूळ रहिवासी आहेत, ही बाब सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. आपल्या मातीतील कन्या इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या पदावर पोहोचल्याने महिला सक्षमीकरणाला मोठा वाव मिळाला आहे असे यावेळी उपस्थित महिलांकडून बोलण्यात आले. या सत्कारप्रसंगी भाजपच्या अनेक प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यामध्ये जिल्हा पदाधिकारी मेघा गांगण, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष सावी लोके, वैभववाडी महिला मंडल अध्यक्ष प्राची तावडे, कुडाळ महिला मंडल अध्यक्ष आरती पाटील, ओरोस महिला मंडल अध्यक्ष सुप्रिया वालावलकर, वेंगुर्ला महिला मंडल अध्यक्ष सुजाता पडवळ, सावंतवाडी महिला मंडल शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, कणकवली ग्रामीण महिला मंडल अध्यक्ष हर्षदा वाळके आणि कुडाळ तालुका सदस्य साधना मांडिये यांचा समावेश होता.