पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा.

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा.

सिंधुदुर्ग.

    सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि.8 मार्च 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
   शुक्रवार दि. 8 मार्च 2024 रोजी सकाळी 8.20 वाजता मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व कणकवली जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता कणकवली येथे आगमन व शासकीय विश्रामगृह कणकवली इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ, शासकीय विश्रामगृह कणकवली. सकाळी 9.45 वाजता कणकवली येथून वैभववाडीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रमगृह, फोंडा इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ, शासकीय विश्रामगृह फोंडा. सकाळी 11 वाजता वैभववाडी येथे आगमन व पंचायत समिती, वैभववाडी नुतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ, पंचायत समिती, वैभववाडी. सकाळी 1115 वाजता वैभववाडी येथून ओरोस जि. सिंधुदुर्गकडे  प्रयाण. दुपारी 12.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,ओरोस येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक  व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामे तसेच जिल्ह्यातील विविध विकास कामांचे आभासी प्रध्दतीने भुमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती.  स्थळ, जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,ओरोस. दुपारी 1.30 वाजता "महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत" या विषयी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या नोटीसीबाबत आढावा बैठक. स्थळ, जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस. दुपारी 1.45 वाजता राखीव. दुपारी 2.30 वाजता ओरोस येथून कुणकेश्वर  देवगडकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता कुणकेश्वर मंदिर येथे आगमन व "कुणकेश्वर दर्शन".सायं. 5.30 वाजता कुणकेश्वर ता. देवगड येथून मोपा, गोवाकडे प्रयाण.