कणकवली महाविद्यालय येथे २ डिसेंबर रोजी विभागीय आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धा.

कणकवली.
मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास कक्ष आणि कणकवली महाविद्यालयातील आविष्कार संशोधन विभाग यांच्या समिती विद्यमाने शनिवारी दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वेळेत विभागीय पातळीवरील संशोधन प्रकल्प सादरीकरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या संशोधन प्रकल्प स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थी सत्तरहून अधिक संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहेत. यावेळी मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास कक्षाचे संचालक डॉ. सुनील पाटील, आविष्कार विभाग जिल्हा समन्वयक डॉ .ज्ञानेश्वर शिरसाट ,जिल्हा सह समन्वयक डॉ.उमेश पवार,व तज्ञ परीक्षकवृंद उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
आविष्कार संशोधन प्रकल्प उद्घाटन व प्रमाणपत्र वितरण समारंभासाठी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव श्री विजयकुमार वळंजू व संस्था पदाधिकारी तसेच प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे उपस्थित राहणार आहेत. या संशोधन प्रकल्प स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सर्व आविष्कार विभाग प्रमुख व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कणकवली महाविद्यालयातील आविष्कार विभागाच्या समन्वयक प्रा.नूतन घाडीगावकर यांनी केले आहे.