वाचन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन.

सिंधुदुर्ग.

   भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात  करण्यात आली. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी रवि पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
   याप्रसंगी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सामान्य शाखाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, भूसंपादनाचे उपजिल्हाधिकारी, सर्जेराव मस्के- पाटील, यांना ग्रंथ भेट देवून स्वागत करण्यात आले.
   जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. तसेच, याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी रवि पाटील यांनी वाचनाचे महत्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
   ग्रंथ प्रदर्शनात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके, विज्ञान, तंत्रज्ञान, अवकाश इत्यादी विषयावरील पुस्तके ग्रंथप्रर्दशनात मांडण्यात आली आहेत. तसेच "350 वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव शिवचरित्र्यपर पुस्तकांच्या वाचनाचा" या संकल्पनेनुसार ग्रंथालयात उपलब्ध असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
   वाचन प्रेरणा दिनानिमित्तचे ग्रंथप्रदर्शन दि. १६/१०/२०२३ ते दि. २०/१०/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सर्वांसाठी खुले राहिल. याचा लाभ जास्तीत जास्त वाचक, सभासद, सर्व अधिकारी/कर्मचारी व वाचनप्रेमी नागरिकांनी घ्यावा ,असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे  यांनी केले आहे.