सुदन कवठणकर यांचा मळेवाड आरोग्य उपकेंद्राच्या वतीने सत्कार
सावंतवाडी
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आरोंदा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले नवनिर्वाचित सदस्य सुदन उर्फ सुधा कवठणकर यांचा मळेवाड उपकेंद्राच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मळेवाड आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम मस्के, सौ. सुमन कवठणकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अदिती ठाकरे, शंकर परसेकर, प्रभाकर परसेकर, खाडेकर, आरोग्य सेवक प्रदीप चव्हाण आदी उपस्थित होते. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री. कवठणकर आगामी काळात विशेष प्राधान्य देतील, असा विश्वास वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम मस्के यांनी यावेळी व्यक्त केला.

konkansamwad 
