वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर

 

वेंगुर्ला

 

         राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींचे आरक्षण आज मुंबईत मंत्रालय येथे सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले असून वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण आरक्षणदेखील जाहीर झाले आहे. यापूर्वी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी पुरुष आरक्षण होते त्यावेळी दिलीप उर्फ राजन गिरप निवडून आले होते.आता हे आरक्षण बदलून सर्वसाधारण आरक्षण पडल्यामुळे अनेक जण इच्छुक होणार आहेत. तसेच नगरसेवक पदांची आरक्षण सोडत बुधवार दि. ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ले नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृह येथे होणार आहे.