वेंगुर्ला परुळे येथे राधारंग फाउंडेशनच्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद , ४६० स्पर्धकांचा सहभाग
वेंगुर्ला
राधारंग फाउंडेशनची RRF HALF MARATHON 2025 परुळे येथे संपन्न झाली. पहाटे ६ वा. RRF HALF MARATHON सुरु झाली यंदाचे तिचे चौथे वर्ष आहे. परुळे हायस्कुल ते देवली पूल या मार्गावर ही मॅरेथॉन संपन्न झाली. यावर्षी जिल्ह्यातील व बाहेरील असे मिळून ४६० स्पर्धकांचा सहभाग लाभला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई, डॉ. उमाकांत सामंत, सचिन देसाई आदींसह राधा रंग फाऊंडेशन चे पदाधिकारी तसेच परुळे युवक कला क्रिडा मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावर्षी आम्ही ५, १० व २१ किमी या तीन प्रकारात या हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये सर्व सहभागींना टी-शर्ट, मेडल्स, अल्पोपहार, एनर्जी ड्रिंक्स, प्रथमोपचार, फिजिओथेरपी इत्यादी सुविधा देण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सहभागी असलेल्या स्पर्धकांना राधारंग फाउंडेशन व परुळे युवक कला क्रिडा मंडळा तर्फे पदक देऊन गौरविण्यात आले आहे.