परुळे येथे विद्यार्थ्यांना भगवद्गीता ग्रंथांचे वाटप

वेंगुर्ला
जिल्हा परिषद शाळा नंबर ३ येथे विद्यार्थ्यांना भगवद्गीता ग्रंथांचे वाटप करण्यात आले. पुणे येथील टाटा मोटर्स कंपनीत डिजिएम पदावर असलेले महेंद्र मोटे आणि त्यांच्या पत्नी यांनी या ग्रंथांचे वाटप केले. यावेळी मुख्याध्यापक प्रविणा दाभोलकर, शिक्षक दत्तात्रय म्हैसकर, सानिका परुळेकर यांसह विद्यार्थी उपस्थित होते. श्री. मोटे दाम्पत्य हे बऱ्याच शाळामध्ये मुलांना आपल्या धार्मिक ग्रंथांची ओळख व्हावी, या ग्रंथात जीवनाचे सार सांगितले आहे त्यांचे महत्व पटावे या हेतूने हा उपक्रम राबवितात. यावेळी त्यांनी परुळे शाळा नंबर ३ येथे थांबून शाळेची माहिती घेतली याबाबत शाळेला कल्पना दिली व इच्छा व्यक्त केली. त्यानंतर हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला.