वागदे गोपुरी आश्रम येथे २३ ऑगस्ट रोजी साने गुरुजी संवाद यात्रेचे आयोजन.

वागदे गोपुरी आश्रम येथे २३ ऑगस्ट रोजी साने गुरुजी संवाद यात्रेचे आयोजन.

कणकवली.

   वागदे गोपुरी आश्रम येथे राष्ट्रसेवा दल, महाराष्ट्र व गोपुरी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार २३ ऑगस्ट, २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता गोपुरी आश्रमाच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंदात (नाईक पेट्रोल पंपाच्या मागे) ‘साने गुरुजी संवाद यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे.
    यानिमित्ताने साने गुरुजी यांच्या विचारांवर आधारित दोन तासांचा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये गीत, संवाद तसेच राष्ट्र सेवा दलाचे पूर्णवेळ सेवक साथी बाबासाहेब नदाफ व त्यांचे सहकारी यांच्या समवेत संवाद साधण्यात येणार आहे. साने गुरुजी यांचे विचार नवीन पिढीला समजावेत यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  या कार्यक्रमासाठी  विद्यार्थी, पालक, शिक्षक व साने गुरुजी प्रेमी यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन गोपुरी आश्रम परिवारातर्फे करण्यात आले आहे.