फोंडाघाट महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

फोंडाघाट महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा


 

फोंडाघाट
 

       देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात देशभक्तीच्या वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वज फडकताच उपस्थितांनी 'जन गण मन' राष्ट्रगीताने देशाभिमान व्यक्त केला. ध्वजारोहणानंतर महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांनी सलामी देत आकर्षक संचलन सादर केले. प्राचार्य डॉ. नारे यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांचे त्याग, लोकशाही मूल्यांचे महत्त्व आणि विद्यार्थी वर्गाने देशाच्या प्रगतीत घ्यावयाची भूमिका यावर प्रकाश टाकला. त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशसेवेची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमानंतर महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या वतीने सर्व उपस्थितांना खाऊचे वाटप करण्यातआले. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीपर गीतांच्या स्वरांनी आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला.