मयंक चक्रवर्ती भारताचा ९४ वा ग्रँडमास्टर

मयंक चक्रवर्ती भारताचा ९४ वा ग्रँडमास्टर

 

नवी दिल्ली

 

     प्रतिभावान युवा खेळाडू मयंक चक्रवर्तीन आपल्या आशादायक कारकिर्दीतील अंतिम अडथळा पार करत आपला तिसरा आणि अंतिम 'ग्रँडमास्टर नॉर्म' मिळवला आहे.. यासह तो भारताचा ९४ वा ग्रैंडमास्टर ठरला असून ईशान्य भारताच्या प्रदेशातून हा प्रतिष्ठित किताब मिळवणार पहिलाच खेळाडू बनला आहे.आसाममधील गुवाहाटीचा रहिवासी असलेला १७ वर्षीय चक्रवर्ती २०२४ मध्ये 'इंटरनॅशनल मास्टर' बनला. स्टॉ कहोम नॉर्थ बाय फर्स्ट हॉटेल्स चेस टॅ लेंट्स स्पर्धेच्या आठव्या फेरीत आणि एक फेरी बाकी असतानाच त्याने ही कामगिरी साध्य केली. या फेरीत त्याने स्वीडिश इंटरनॅशनल मास्टर फिलिप लिंडग्रेनचा पराभव केला.लिंडग्रेनवरील विजयादरम्यान चक्रवर्ती आपल्या खेळाच्या सर्वोच्च शिखरावर होता. त्याने आवश्यक असलेले ६.५ गुण जमा केले, जे त्याचा अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म निश्चित करण्यासाठी पुरेसे ठरले. अंतिम फेरीत त्याने इंग्लंडचा इंटरनॅशनल मास्टर जोना बी. विलो याच्याशी एक रोमांचक बरोबरी साधली आणि आतापर्यंतची आपली सर्वात अविस्मरणीय कामगिरी पूर्णत्वास नेली.या प्रक्रियेत चक्रवर्तीने २५०० एलो रेटिंगचा महत्त्वाचा टप्पाही ओलांडला. त्याचे सध्याचे रेटिंग आवश्यक स्तरापेक्षा काही गुणांनी अधिक आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या नियमांनुसार त्याचा ग्रँडमास्टर किताब अधिकृतपणे निश्चित झाला आहे. चक्रवर्तीने या स्पर्धेत एक सामना गमावला, दोन सामने बरोबरीत सोडवले आणि उर्वरित सहा सामने जिंकले.