पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा कल्याणकर कुटुंबीयांना धीराचा दिलासा

पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा कल्याणकर कुटुंबीयांना धीराचा दिलासा

 

बांदा 


       बांदा येथील माजी सरपंच मंदार कल्याणकर यांचे वडील कै. दिनकर कल्याणकर यांच्या निधनानंतर पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी बांदा येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देत कल्याणकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.
       यावेळी जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, व्हाईस चेअरमन अतुल काळसेकर, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शामकांत काणेकर, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, माजी सभापती शीतल राऊळ तसेच अंकुश जाधव, आबा धारगळकर, रत्नाकर आगलावे, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
       पालकमंत्र्यांच्या भेटीने कल्याणकर कुटुंबीयांना भावनिक दिलासा मिळाला.