आनंदवाडी येथे ६७ वा धम्मचक्र प्रर्वतन दिन उत्साहात साजरा.

वेंगुर्ला.
बौध्द हितवर्धक महासंघ मुंबई तालुका शाखा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, दलित सेवा मंडळ व सावित्रीबाई महिला मंडळ वेंगुर्ला आनंदवाडी यांचे वतीने मंगळवार दिनांक २४ ऑक्टोंबर रोजी वेंगुर्ला आनंदवाडी समाज मंदिर येथे ६७ वा धम्मचक्र प्रर्वतन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली.यावेळी २२ प्रतिज्ञांचं वाचन करण्यात आले.
याप्रसंगी आयु.वाय.जी.कदम यांनी धम्मचक्र प्रर्वतन दिन व सम्राट अशोका विजया दशमी याबाबत आपले विचार मांडले.तसेच आयु.प्रेमानंद जाधव व आयु.किरण जाधव, आयु.कृष्णदर्शन जाधव, आयु.अमोल जाधव यांनी आपले विचार व्यक्त करून उपस्थितांना धम्मचक्र प्रर्वतन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास वामन कांबळे, सुरेश जाधव, सुभाष जाधव, पंढरी जाधव, सखाराम जाधव, गजानन जाधव, जयंत जाधव, गौतम जाधव, प्रदिप जाधव, दामोदर जाधव, महेंद्र जाधव, प्रणील जाधव, श्रेयस जाधव, सुजल जाधव, आर्यन जाधव, प्रज्वल जाधव, साहिल जाधव, तनिष जाधव, जतिन जाधव, सई जाधव तसेच धम्म बांधव-भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल जाधव यांनी केले तर शेवटी किरण जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.