यु-ट्यूबर रणवीर अलाहबादियाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, काही अटींवर शो सुरु ठेवण्यास परवानगी

यु-ट्यूबर रणवीर अलाहबादियाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा,   काही अटींवर शो सुरु ठेवण्यास परवानगी

 

दिल्ली

        पॉडकास्टर, यु-ट्यूबर रणवीर अलाहबादियाला दिलासा मिळाला आहे. त्याला त्याचा शो ऑन एयर करण्याची परवानगी दिलीय. कॉमेडियन, यूट्यूबर समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लॅटेंट' मध्ये अश्लील कॉमेंट केल्याने रणवीर अडचणीत सापडला होता. त्याच्यावर अनेक बंधने लावण्यात आली होती. आता त्याला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला असून काही अटींवर शो सुरु ठेवण्यास परवानगी मिळालीय.कोर्टाने 'द रणवीर शो' ला सुरू ठेवण्याची परवानगी दिलीय. मीडिया रिपोर्टनुसार, कोर्टाने सांगितेल आहे की, शो पब्लिश करताना वेळ, मर्यादा पाळाव्यात. रणवीरला एक अंडरटेकिंग द्यायला हवे, ज्यामध्ये हे निश्चित असण गरजेच आहे की, त्याच्या शोमध्ये नैतिकतेचे पालन करण्यात आले आहे. जेणेकरून सर्व वयोगटातील प्रेक्षक हा शो पाहू शकतील.