एआय क्रांतीमुळे ऊर्जेची मागणी उच्चांकावर...२०३० पर्यंत जगभरात वीज टंचाईचे सावट ?

एआय क्रांतीमुळे ऊर्जेची मागणी उच्चांकावर...२०३० पर्यंत जगभरात वीज टंचाईचे सावट ?

न्यूयॉर्क

 

   कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील अभूतपूर्व वाढीमुळे जागतिक स्तरावर ऊर्जेच्या मागणीने एका नव्या युगात प्रवेश केला आहे. 'मॉर्गन स्टॅनले'च्या अलीकडील परिषदेतील निष्कर्षानुसार, गेल्या दशकभरातील सर्वात वेगाने ऊर्जेचा वापर वाढत असून, 2030 पर्यंत दरवर्षी 1 ट्रिलियन किलोवॅट-तास इतकी अतिरिक्त विजेची गरज भासणार आहे. 'एआय' चालवण्यासाठी लागणारे अवाढव्य 'डेटा सेंटर्स' या एकूण ऊर्जा वाढीमध्ये तब्बल 20 टक्के (एक पंचमांश) वाटा उचलत आहेत.2028 पर्यंत या डेटा सेंटर्सची ऊर्जेची मागणी दरवर्षी 126 गिगावॅट (GW) ने वाढण्याची शक्यता आहे. ही मागणी कॅनडासारख्या मोठ्या देशाच्या एकूण वार्षिक वीज वापराइतकी प्रचंड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वीज वाहक ग्गीडमध्ये पुरेशी गुंतवणूक न झाल्यामुळे 2027 आणि 2028 मध्ये डेटा सेंटर डेव्हलपर्सना वीज टंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, भांडवली बाजारातील गुंतवणूकदार आता ऊर्जा पायाभूत सुविधा प्रकल्पांना गतीने वित्तपुरवठा करण्याच्या संधी शोधत आहेत. विशेषतः वीज पुरवठादार आणि वीज उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांना या एआय लाटेचा मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या 'मॉर्गन स्टॅनले थीमॅटिक कॉन्फरन्स'मध्ये एका ऑन-साइट वीज निर्मिती कंपनीच्या सीईओनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले : 'जग जसे डिजिटल आणि एआयद्वारे विद्युतीकृत होत आहे, तशी केवळ विजेची मागणीच वाढणार नाही, तर विशिष्ट प्रकारच्या विजेची गरज भासणार आहे, जी सध्याची पारंपरिक ग्गीड यंत्रणा पुरवू शकणार नाही. जर 'एआय' मुळे अर्थव्यवस्थेत 10 ट्रिलियन डॉलर्सची वाढ होणार असेल, त्यासोबत वाढणाऱ्या अफाट वीज वापराचा विचार करणेह सध्या मती गुंग करणारे आहे.