कुडाळ येथे लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त

कुडाळ येथे लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त

 

कुडाळ
 

         स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. कुडाळ बाजारपेठेतील राधाकृष्ण कोल्ड्रिंक्सच्या बाजूला असलेल्या एका पान टपरीमध्ये हा अवैध साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹२,८८,६६०/- (दोन लाख अठ्ठ्यांशी हजार सहाशे साठ रुपये) किमतीचा अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला.याप्रकरणी चार संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, ३(५) आणि अन्न सुरक्षा मानके कायदा कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीपणे पार पाडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, तसेच पोलीस हवालदार विल्सन डिसोजा आणि आशिष जामदार यांचा समावेश होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.