श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या वतीने ज्येष्ठ पखवाज वादक पंडित भवानी शंकर व गायक रशीद खाँ, प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली.
कुडाळ.
डॉ. दादा परब आणि भजन सम्राट भालचंद्र केळुसकर संचलित श्री जगन्नाथ संगीत विद्यालय प्रशिक्षक पखवाज अलंकार महेश विठ्ठल सावंत यांच्या वतीने तसेच पखवाज विशारद दत्तप्रसाद खडपकर आणि श सचिन कातवणकर आणि युवा गायक अमित उमळकर संगीत अलंकार प्रफुल्ल रेवंडकर यांच्या उपस्थितीत श्री जगन्नाथ संगीत विद्यालय विद्यार्थी वर्ग यांच्या वतीने भारताचे ज्येष्ठ पखवाज वादक गुरुतुल्य असलेले पंडित कै.भवानी शंकर तसेच गायक रशीद खाँ आणि प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली संगीत कलेतून वाहण्यात आली.
यावेळी पखवाज प्रशिक्षक महेश सावंत बोलताना म्हणाले आम्ही जरी पंडीतजींकडे प्रत्यक्ष जरी शिकलो नाही तरी त्यांच्या वादनातून आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळाली म्हणून आपण त्यांच्या अशा श्रध्दांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन आंदुर्ले येथे पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या निवासस्थानी रविवार १४ जानेवारी रोजी करण्यात आले व त्यांच्या रचना मधून पखवाज वादनाने पंडितजींना श्रध्दांजली वाहीली त्यांचे आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहतील असेही ते म्हणाले तसेच या कार्यक्रमावेळी आंदुर्ले गावचे उपसरपंच चंद्रकिसन मोर्ये, म्हापण माजी सरपंच नाथाभाई मडवळ तसेच विद्यालयाचे प्रशिक्षक, विद्यार्थी पालक वर्ग, गायक, वादक व संगीत श्रोते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.