हरकुळ येथे कृषी महाविद्यालय फोंडाघाटच्या कृषीदूतांनी केले मार्गदर्शन. ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना दिली माहिती.

हरकुळ येथे कृषी महाविद्यालय फोंडाघाटच्या कृषीदूतांनी केले मार्गदर्शन.  ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना दिली माहिती.

कणकवली.

  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या हरकुळ येथे नुकतेच, ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषीदूतांनी नुकतेच, 'ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम' अंतर्गत निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याचे तंत्र याचे मार्गदर्शन केले
  या मार्गदर्शनात कृषीदूतांनी, सुक्या चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते व कर्बोदकांचे प्रमाण नगण्य असते. प्रथिने अत्यल्प असतात त्यामुळे ती पचण्यास कठीण जातात. हे सर्व लक्षात घेऊन सुक्या निकृष्ट चाऱ्यावर योग्य प्रक्रिया करून जनावरांच्या खाद्यात वापरला तर अनुकूल परिणाम दूध उत्पादन आणि वाढीवर होतो अशी माहिती दिली.
  तसेच सतत सुका चारा खाऊ घातल्यामुळे खनिज द्रव्ये, प्रथिने आणि कर्बोदकांची कमतरता निर्माण होऊन जनावरांना शारीरिक आजार होण्याचे शक्यता असते. सुक्या चाऱ्यामध्ये प्रथिने कमी असल्यामुळे जनावर ढेरपोटे (जलोदर) दिसते. अशा सुक्या निकृष्ट चाऱ्यावर योग्य प्रक्रिया करून जनावरांच्या खाद्यात वापरला, तर त्याचा अनुकूल परिणाम दूध उत्पादन आणि जनावरांच्या वाढीवर होतो असे मार्गदर्शन कृषीदूतांनी केले.
    यावेळी योगेश दंताळ, ऋतुराज सावंत, दुर्वेश रावराणे, नमित आचरेकर, सौरभ पुजारी, हर्ष शेट्ये, सोमनाथ वेटे, मोहनिश देसाई, दिपक वाडेकर, विनायक मोडक आदी उपस्थित होते.