मच्छीमार समाजासाठी मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न

सिंधुदुर्ग
मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या माध्यमातून वेंगुर्ला येथे मच्छीमार समाजासाठी मोफत महा आरोग्य शिबिर घेण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन मच्छीमार नेते श्री. वसंत तांडेल आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर श्री. जयंत मोंडकर, तुषार साळगावकर व डॉ. शाम राणे उपस्थित होते.
बालरोग, स्त्रीरोग, अस्थिरोग, कान-नाक-घसा, त्वचा, नेत्र व मानसोपचार अशा विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार केले. मानसिक आरोग्य समुपदेशन, पोषण मार्गदर्शन, व्यसनमुक्ती सल्ला तसेच आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड आणि वय वंदना कार्ड तयार करण्याची सुविधा देण्यात आली. सुमारे २०० मच्छीमार समाजबांधवांनी या शिबिराचा लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमाच्या यशात श्री. वसंत तांडेल, श्री. जयंत मोंडकर, डॉ. रवींद्र लिलाके, डॉ. संदीप सावंत आणि संपूर्ण आरोग्य विभागाचे सहकार्य मोलाचे ठरले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंबेरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौदागर यांनी केले