वेंगुर्ला येथे श्री शनिदेव मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा व हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन.

वेंगुर्ला येथे श्री शनिदेव मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा व हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन.

 


वेंगुर्ला 

 

          वेंगुर्ल्यातील मारुती मंदिर येथे श्री शनिदेव मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा व सार्वजनिक हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्त बुधवार दि. 2 एप्रिल रोजी प्रायश्चित विधी, देवता प्रार्थना, गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन नांदि श्राद्ध, आचार्यवरण, स्थळप्राकार शुद्धी कर्मप्रधान देवता आवाहन-पूजन, जलाधिवास, ग्रहयजन, वास्तुयजन, नैवैद्य, आरती त्याचबरोबर सायं. 7:00 वाजता आरती व 7:30  वाजता भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दि. 3 एप्रिल रोजी श्री देव ब्राह्मण व मारुती वर्धापन दिन असून त्यानिमित्त सकाळी 6:00 वाजता श्रींची विधिवत पुजा व लघुरुद्ध, सकाळी 7:00 वाजता स्थळप्राकार शुद्धी, आवाहित देवता पूजन प्रधान होम त्यानंतर 10 वाजून 32 मिनिटांनी शनिदेव मूर्ती प्रतिष्ठापना तत्वज्ञास, प्राणप्रतिष्ठा, महापूजा, बलिदान, पूर्णाहुती, महानैवेद्य, आरती सामूहिक प्रार्थना व दुपारी 1:00 पासून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सायं. 7:00 वाजता आरती व सायं. 7:30 वाजता भजनाचा कार्यक्रम आहे. श्री राम जन्मोत्सव रविवार दि.6 एप्रिल रोजी सकाळी 10:00 वाजता ह.भ.प. श्री अवधूत बुवा नाईक यांचे किर्तन दुपारी 12:00 वाजता राम जन्मोत्सव, पुष्पवृष्टी, तीर्थप्रसाद, सायं. 7:30 वाजता आरती व तीर्थप्रसाद रात्री 8:00 वाजता भजनाचा कार्यक्रम आहे. तसेच श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 8 एप्रिल ते शुक्रवार दिनांक 11 एप्रिल पर्यंत विविध दशावतारी नाट्यमंडळांचे नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. शनिवार दि.12 एप्रिल रोजी पहाटे 4:30 वाजता श्री मारुतीला अभिषेक व पुजा, पहाटे 5:00 वाजता ह.भ.प. डॉ. श्री रमेश पाटकर (माणगांव) यांचे किर्तन, सकाळी 6:00 वाजता श्री हनुमान जन्मोत्सव आती आरती व तीर्थप्रसाद, सायं 5:00 वाजता श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद, सायं 7:00 वाजता आरोलकर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ला यांचा  नाट्यप्रयोग सादर होणार आहे. उत्सव काळात दर दिवशी सायं. 6:30 वाजता श्री मारुतीरायाची आरती असेल. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा व वरील सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मंदिर सेवा न्यास, वेंगुर्ला यांच्याकडून करण्यात आले आहे.