विशाल परब यांच्या माध्यमातून कोनाळ मतदारसंघात शैक्षणिक साहित्याचे वाटप.

विशाल परब यांच्या माध्यमातून कोनाळ मतदारसंघात शैक्षणिक साहित्याचे वाटप.

दोडामार्ग.

   सामाजिक बांधिलकी जपत समाजात कला, क्रिडा, शैक्षणिक मदतकार्य सातत्याने भाजपा प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून सुरु असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मदतकार्य सुरुच आहे. दोडामार्ग तालुक्यातील कोनाळ जिल्हा परिषद मतदारसंघातील बोडदे, शिंरगे, खानयाळे शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.
   जनतेला आपलासा वाटणारा नेता अशी अल्पावधीतच स्वतःची ओळख निर्माण करत जनतेतुन आपला माणूस म्हणून आपलुकीने विशाल परब यांच्या कडे मदतीसाठी मागणीचा जोर वाढतच आहे. दोडामार्ग तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांला दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमांस तुफान प्रतिसाद लाभत असून बोडदे, शिंरगे, खानयाळे शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
   यावेळी जिल्हा सरचिटणीस रंगनाथ गवस, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष साक्षी नाईक, ग्रामपंचायत सदस्य सौ.गवस, युवा मोर्चा बुथ अध्यक्ष समिर घाडी, मुख्याध्यापक महेश नाईक, शिक्षक पुनम खोराटे, पालक गुरुदास जाधव, संदिप नाईक, शिंरगे सरपंच प्रकाश कदम, मुख्याध्यापक श्री.भोसले, सोशल मीडिया प्रमुख शिरिष नाईक, महेश पारधी,  राकेश गवड यांच्यासह पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.