सावंतवाडी मळेवाड येथे १ मे रोजी जिल्हास्तरीय बैलगाडी स्पर्धा

सावंतवाडी मळेवाड येथे १ मे रोजी जिल्हास्तरीय बैलगाडी स्पर्धा

 

सावंतवाडी

 

          युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे आयोजित आणि ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे यांच्या सहकार्याने मळेवाड जकातनाका येथे ३० एप्रिल ते ४ मे २०२५ या कालावधीत 'मळेवाड सांस्कृतिक महोत्सव २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. महोत्सवाची सुरुवात ३० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ३ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सत्यनारायण पूजेने होईल. त्यानंतर रात्री ठीक ७ वाजता जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग रंगणार आहे. १ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मळेवाड आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी दुपारी २:३० वाजता जिल्हास्तरीय बैलगाडी दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.२ मे २०२५ रोजी रात्री ठीक ९ वाजता वेशभूषा स्पर्धा आणि रेकॉर्ड डान्स स्पर्धा रंगणार आहेत. यानंतर मळेवाड कोंडुरे महिला मंडळ आपली विनोदी एकांकिका सादर करेल, ज्यामुळे उपस्थितांना हास्याची मेजवानी मिळेल.३ मे २०२५ रोजी रात्री ठीक ९ वाजता जिल्हास्तरीय खुली ग्रुप डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक नृत्य मंडळे आपली कला सादर करतील.महोत्सवाच्या सांगता समारंभात, म्हणजेच ४ मे २०२५ रोजी रात्री ९ वाजता 'कोकण सुंदरी २०२५' ही सौंदर्य स्पर्धा आणि महिलांसाठी 'स्मार्ट सौभाग्यवती' स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे  आवाहन ग्रामपंचायततर्फे करण्यात आले आहे.