कणकवली येथे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

कणकवली येथे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

कणकवली.

   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक विकासात प. पू. भालंचद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळाचे योगदान मोठे आहे. मंडळाचा जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग व सराव परीक्षा हे शैक्षणिक उपक्रम स्तुत्य आहेत. मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील टॉपर हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये अव्वलस्थानी असतात, ही बाब सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असे कौतुकोद्गार प. पू. भालचंद्र महाराज संस्थानाचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी काढले.
   प. पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळातर्फे येथील कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसील सभागृहात जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते. या शुभारंभप्रसंगी श्री. कामत बोलत होते. यावेळी संस्थानाचे विश्वस्त  निवृत्ती धडाम, प्रसाद अंधारी, शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष गजानन उपरकर, निवृत्त प्रा. दिवाकर मुरकर, कळसुलकर हायस्कूलचे शिक्षक सिद्धेश कुलकर्णी, मंडळाच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे समन्वयक रावजी परब, मार्गदर्शक अमोल नवलपुरे, कल्याण कडेकर, संजय कोरके, शरद हिंदेळकर, मंगेश तेली, श्रीकृष्ण कांबळी, प्रकाश परब, काशीनाथ कसालकर, विष्णू सुतार, सुहास आरोलकर, सदानंद गावकर, किरण कोरगावकर आदी उपस्थित होते.
   अमोल नवलपुरे म्हणाले, प. पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळाचा शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग व शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा उपक्रम स्तुत्य आहे. याचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. याशिवाय विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना मंडळाच्या विविध शैक्षणिक उपक्रमाचे कौतूक केले. आरंभी मान्यवरांचे स्वागत शरद हिंदळेकर, मंगेश तेली, श्रीकृष्ण कांबळी यांनी केले. प्रास्ताविकेत गजानन उपरकर यांनी शैक्षणिक मंडळ स्थापन करण्याच उद्देश विशद केला. सूत्रसंचालन विष्णू सुतार यांनी केले. या शिष्यवृत्ती वर्गाला पूर्व प्राथिमक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा देणारे ३६० विद्यार्थी तर व त्यांचे पालक उपस्थित होते. हा वर्ग यशस्वी कॉलेजच्या प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले. हा वर्ग यशस्वी होण्याकरिता प. पू. भालचंद्र महाराज शैक्षणिक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेतली.