शिवसेनेच्या खत वाटप व वह्या वाटप उपक्रमास शेतकरी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

शिवसेनेच्या खत वाटप व वह्या वाटप उपक्रमास शेतकरी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

वेंगुर्ला.

    माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ला उ.बा.ठा सेनेच्या वतीने म्हापण विभागातील शेतकऱ्यांना खत वाटप व शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, संपर्क प्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
   विभागातील  शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत जवळपास 200 शेतकरी वर्गाने याचा लाभ घेतला.महागाईच्या खाईत शेतकरी फरफटला जात असताना शिवसेना सामाजिक बांधिलकी जपत शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले खत वाटप करुन आम्हा शेतकऱ्यां बद्दल आपुलकी निर्माण केली म्हणून उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
   यावेळी पक्षा सोबत एकनिष्ठ राहिलेल्या ग्रामपंचायत सदस्य यांचा जिल्हाप्रमुख संजय पडते व संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करुन सन्मानित करण्यात आले.
   यावेळी वेंगुर्ला तालुका संपर्क प्रमुख भालचंद्र चिपकर, तालुका प्रमुख बाळु परब, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, शहरप्रमुख अजित राऊळ, युवासेना तालुका प्रमुख पंकज शिरसाट, महिला उपशहरप्रमुख कोमल सरमळकर, उपतालुकाप्रमुख मनोहर येरम, विभाग प्रमुख राऊळ, उप विभाग प्रमुख साटम, परुळे उप विभाग प्रमुख निलेश परुळेकर, केळुस सरपंच योगेश शेट्ये, म्हापण विभागातील ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते युवतीसेना उपस्थित होते.